मुंबई

खाजगीकरणाविरोधात कम्युनिस्ट रस्त्यावर

CD

खासगीकरणाविरोधात कम्युनिस्ट रस्त्यावर
कामगार कायदे बदलांना विरोध, महाविकास आघाडीचा आंदोलनाला पाठिंबा

कासा, ता. १२ (बातमीदार) : शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात तसेच कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या बदलांच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिष्ट पक्ष रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही या आंदोलनात सहभागी होत तलासरी व डहाणू तालुक्यात तीव्र आंदोलन केले.
गुरुवारी (ता. १२) तलासरी येथील सागर नाका परिसरात मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला. या वेळी आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील भाजप सरकार देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, शेतकरी व कामगारांचे हक्क पद्धतशीरपणे खासगी भांडवलदारांच्या घशात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने अदाणी-अंबानींसारख्या उद्योगपतींना संपूर्ण देशच विकून टाकला आहे. यामुळे शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे परखड मत आमदार निकोले यांनी व्यक्त केले. कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल हे कामगारवर्गाच्या विरोधात असून, त्यातून रोजगाराची असुरक्षितता वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच खासगीकरणामुळे शासकीय सेवा महाग होऊन सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात संघटनेचे ब्रायन लोगो, मधुबन धोंडी, शिवसेना ठाकरे गटाचे संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तन्मय बारी यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करीत शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय तात्काळ घ्यावेत, अशी मागणी केली. तलासरीसह डहाणू तालुक्यातही विविध ठिकाणी अशाच स्वरूपाची निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन शांततेत पार पडले. शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन खासगीकरण व कामगारविरोधी धोरणांचा पुनर्विचार करावा, अशी ठाम भूमिका या वेळी व्यक्त करण्यात आली.
----------------------
वाड्यातही निदर्शने
अमेरिकेबरोबर झालेला करार व कामगार कायदा यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्ष, कामगारांच्या अनेक संघटना व शेतकरी संघटना यांनी भारत बंदची हाक दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी वाड्यातील खंडेश्वरी नाका येथे निदर्शने करून कराराची होळी करण्यात आली. काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला होता. या आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. चंदू धांगडा, काॅ. जगदीश मोकाशी, काॅ. प्रकाश चौधरी, काॅ. दिलीप गोतारणे, काॅ. सुनील पाटील, काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, लोकेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुरेश पवार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
---------
मोखाड्यात केंद्राच्या धोरणांचा निषेध

केंद्र सरकारने कामगारांवरती अन्याय करणारा कायदा लागू केला आहे. त्याचबरोबर देशातील सर्व शेतकऱ्यांना कायम देशोधडीला लावण्यासाठी अमेरिकेबरोबर व्यापार करण्याचा करार केला आहे. त्याचा निषेध करीत महाविकास विकास आघाडीने मोखाडा बस स्थानकावर निषेध आंदोलन केले. मोखाड्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर मोखाडा तहसीलदारांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. या निषेध आंदोलनात महाविकास आघाडीतील पदाधिकारी, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख दिलीप बांडे, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष जमशेद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुकाध्यक्ष सनी पवार, अशोक पाटील, अनिल दोंदे, शिवसेना ठाकरे गटाचे मोखाडा संघटक निखिल लोखंडे, उपशहर प्रमुख प्रकाश आरडे, योगेश गोंदके, सनी झिंजुर्डे, जयेश जाधव यांसह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते, युवा सैनिक आणि महिला आघाडी सहभागी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT