मुंबई

उत्तर प्रदेशातून धरपकड

CD

उत्तर प्रदेशातून धरपकड
नवी मुंबई पोलिस हल्ला प्रकरणात कारवाई
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : उलवेतील शगुन चौकात पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मोहम्मद सुहैलला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अटक आरोपींची संख्या सहावर गेली आहे.
मानखुर्द पोलिसांचे पथक सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण मांढरे यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज तस्कराला पकडण्यासाठी उलवे येथे आले होते. या वेळी इस्माईल शेख, शाहीद खान, त्यांच्या साथीदारांनी तलवारी, चॉपर, गावठी कट्ट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांसह चौघे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे मिराज नियाज खान, निजाम शरीफ खान, सुमेर बच्चुलाल यादव, जाफर गफार खान, झफर कादर खानला अटक केली होती. या प्रकरणात प्रयागराजमधील मऊआईमा येथे मित्राला भेटण्यासाठी येणाऱ्या आरोपी सुहैलला यूपी एसटीएफस नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. प्रयागराज न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर उलवे पोलिसांनी नवी मुंबईत आणले आहे.
-------------------------------------
हल्ल्यात सहभागी असलेले आणखी पाच आरोपी अद्याप फरार आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध राज्यांमध्ये रवाना झाली आहेत. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, लवकरच उर्वरित गुन्हेगारांनाही अटक केली जाईल.
- अर्जुन रजाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उलवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

मोठी बातमी! पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ महिन्यात; मैदानी चाचणी फेब्रुवारी-मार्चअखेर संपणार, लेखी परीक्षेसाठी १:१० उमेदवारांची निवड, वाचा...

SCROLL FOR NEXT