डिजिटल अटकचा बनाव फसला
ज्येष्ठ महिलेची ५५ लाखांची फसवणूक टळली
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : वाशीतील ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेला डिजिटल अरेस्टची धमकी देऊन ५५ लाख लुटण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. वाशी पोलिस ठाण्यातील सायफाय युनिटमुळे महिलेच्या कष्टाची मोठी पुंजी वाचवण्यात यश आले आहे.
वाशी सेक्टर दोनमध्ये वनमाला भातणकर (७२) यांना शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून एक व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. समोरच्या व्यक्तीने पोलिस अधिकारी असल्याचे भासवून भातणकर यांना घाबरवले. तसेच दिल्लीत सात ते आठ गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना डिजिटल अरेस्ट करत असल्याचे सांगून मानसिक दबावाखाली आणले. सायबर चोरट्यांनी व्हिडिओ कॉल सुरूच ठेवून भातणकर यांच्याकडून बँक ऑफ महाराष्ट्र, एसबीआय खात्यातील एक लाख ३८ हजारांची रक्कम वळती करून घेतली. त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून मुदत ठेवींची माहिती विचारली होती. घाबरलेल्या अवस्थेत भातणकर ५५ लाखांच्या एफडी तोडण्याच्या प्रक्रियेत असताना सायबर सेलशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर अंमलदार संदीप वाघमारे, मयूर जानकर यांनी तातडीने भातणकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर सायफाय युनिटने वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर पावले उचलत तातडीने संबंधित बँकांशी संपर्क साधून दोन्ही खाती बंद केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.