मुंबई

कर्जत नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी राजाभाऊ कोठारी आणि रोहित ओसवाल यांची निवड

CD

कर्जत नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी राजाभाऊ कोठारी आणि रोहित ओसवाल यांची निवड
कर्जत, ता. १४ (बातमीदार) ः नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शनिवारी (ता. १४) राजाभाऊ कोठारी आणि रोहित ओसवाल यांची अधिकृत निवड करण्यात आली. नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
२१ डिसेंबर रोजी लागलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या निकालात परिवर्तन विकास आघाडीचे १३ नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेना-भाजप महायुतीचे आठ नगरसेवक विजयी झाले होते. एकूण २१ सदस्यांच्या नगर परिषदेत दोन्ही गटांना प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा अधिकार होता. त्यानुसार ११ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने राजाभाऊ कोठारी, तर शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने रोहित ओसवाल यांनी अर्ज सादर केला होता. दोन्ही गटांकडून प्रत्येकी एक-एकच अर्ज आल्याने दोघांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, कर्जत नगर परिषदेत दोन्ही गटांकडून सामाजिक व व्यापारी क्षेत्रातील प्रतिनिधींना संधी मिळाल्याने शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भारताचा भव्य-दिव्य इतिहास रुपेरी पडद्यावर ! संजय लीला भन्साळी आणि केतन मेहतांच्या जय सोमनाथ सिनेमाचं पोस्टर रिलीज

SCROLL FOR NEXT