भूमिपुत्रांना दिलासा कधी?
प्रकल्पग्रस्तांसाठी मोफत स्टॉल व व्यवसाय परवान्यात प्राधान्याची मागणी
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला असून अधिकृत हॉकर झोनमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी सोमनाथ नकुल म्हात्रे यांनी राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वडिलोपार्जित जमिनी शासनाने संपादित करून सिडको व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे दिल्यानंतर शेती व खाडीतील मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. औद्योगिक प्रकल्प कमी होणे, कारखाने बंद पडणे आणि वाढत्या नागरीकरणामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. बाहेरील लोकांना पदपथ व्यवसायासाठी प्राधान्य मिळत असताना स्थानिकांच्या स्टॉलवर कारवाई होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. जमीन गमावलेल्या प्रकल्पग्रस्तांना अधिकृत स्टॉल व व्यवसाय परवान्यांमध्ये प्राधान्य दिल्यास त्यांचे आर्थिक पुनर्वसन होऊन कायमस्वरूपी उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होईल आणि स्थानिकांना न्याय मिळेल, हा महत्त्वाचा मुद्दा निवेदनात ठळकपणे मांडण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.