मुंबई

अखेर गारगाई पुलाची दुरुस्ती

CD

अखेर गारगाई पुलाची दुरुस्ती
वाहनचालकांना दिलासा

मोखाडा, ता. १४ ( बातमीदार ) : मोखाडा, खोडाळा, विहीगाव या राज्य महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाचा कठडा तुटला होता. त्यामुळे येथे दुचाकीचे वारंवार अपघात होत होते. या गंभीर घटनेवर ‘सकाळ’ने ‘गारगाई पुलावर जीवाला घोर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची तातडीने दखल घेत बांधकाम विभागाने तुटलेला पुलाचा कठडा बांधला आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मोखाड्यातील या राज्य मार्गावर ३० मीटर लांब आणि २५ मीटर खोलीचा जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल आहे. या पुलाच्या पश्चिमेकडील टोकाचा कठडा मागील वर्षभरापासून ढासळून पडल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले होते. याबाबत लोकप्रतिनिधींकडून अनेक तक्रारी गेल्या होत्या, परंतु बांधकाम प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते. ‘सकाळ’ने ११ फेब्रुवारीला ‘गारगाई पुलावर जीवाला घोर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून ही गंभीर समस्या चव्हाट्यावर आणली. या बातमीची तातडीने दखल घेत दोनच दिवसांत अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या तुटलेल्या पुलाच्या कठड्याचे बांधकाम सुरू झाले आहे. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: नाशिक-मुंबई प्रवास सुपरफास्ट! रेल्वे वाहतूक कोंडी फुटणार, कसारा- मनमाड तिसऱ्या-चौथ्या मार्गाला मंजुरी; कधी होणार पुर्ण?

Maha Shivratri 2026: चंद्राचे मकर राशीत गोचर, 'या' 3 राशींना महाशिवरात्रीला मिळणार राजयोगाचा मोठा लाभ

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले

T20 World Cup: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये घुसला साप; Video होतोय तुफान व्हायरल

Supreme Court: ४०० सिमेंट पिशव्या, ३२ वर्षांचा संघर्ष… अखेर सुप्रीम कोर्टाचा निकाल! छत्रपती संभाजीनगर प्रकरणात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT