व्याघ्रेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा
जांभा दगडातील स्वयंभू शिवमंदिर
पेण, ता. १४ (बातमीदार) : पेणच्या पूर्व भागातील महालमे मीरा डोंगरावर चांदेपट्टी गावाजवळ निसर्गाच्या कुशीत वसलेले जांभा दगडातील घडीव स्वयंभू व्याघ्रेश्वर शिवमंदिर भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गाभाऱ्यात पायऱ्या उतरून जावे लागणारे शिवलिंग, मंदिरासमोरील घडीव दीपमाळ आणि त्याच दगडातील देखणा नंदी ही या मंदिराची वैशिष्ट्ये आहेत. येथे गोमुखातून बाराही महिने स्वच्छ पाणी वाहणारा जिवंत झरा असून परिसरात केवड्याचे बन व पाण्याचे तळे आहे. तळ्याकाठी असलेले मूळ व्याघ्रेश्वर मंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. व्याघ्रवाद्यांच्या वस्तीमुळे या देवस्थानाला ‘व्याघ्रेश्वर’ हे नाव पडल्याची स्थानिकांची धारणा आहे.
मंदिराच्या उत्तरेस असलेला धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतो. येथून आयपीसीएल नागोठणे, धरमतर खाडी तसेच रात्री मुंबईची विद्युत रोषणाई दिसते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराला भेट देऊन जीर्णोद्धार केल्याच्या कथा स्थानिक धनगर समाजात प्रचलित आहेत. श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होत असून निसर्गरम्य वातावरणामुळे शाळा-महाविद्यालयांच्या सहलीही येथे येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.