मुंबई

साकीनाका जंक्शनवरील सुशोभीकरणाची दुरवस्था

CD

साकीनाका जंक्शनवरील सुशोभीकरणाची दुरवस्था
महापालिकेच्या ‘एल’ विभागाकडून देखभालीकडे दुर्लक्ष; नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी
घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) ः साकीनाका जंक्शन परिसरात महापालिकेकडून करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कलाकृतींची दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. दुभाजकावर बसविण्यात आलेल्या वाद्य वाजवणाऱ्या कलापथकाच्या प्रतिकृतींपैकी तीन वादकांच्या मूर्ती मोडलेल्या व विद्रूप अवस्थेत दिसून येत आहेत.
महापालिकेने दुभाजकावर शोभेची झाडे तसेच वन्य आणि पाळीव प्राण्यांच्या प्रतिकृती बसविल्या होत्या. त्यासोबतच वादकांच्या समूहाची आकर्षक कलाकृती उभारण्यात आली होती; मात्र सध्या या कलाकृतींची मोडतोड झाली असून त्यांची देखभाल होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
हे सुशोभीकरण महापालिकेच्या ‘एल’ विभागांतर्गत येते. विभागीय प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या कलाकृती पूर्ववत कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ‘एल’ विभागाच्या उद्यान विभागाचे महेश इराणक यांनी पाहणी करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

विद्युत दिवे बंद
कलाकृतींसाठी बसविण्यात आलेले विद्युत दिवेही मागील वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत. तसेच जंक्शनवरील पाण्याच्या कारंज्याची कलाकृतीही बंद पडली असून त्यावर कचरा व धूळ साचलेली आहे. आजूबाजूला वाढलेल्या झाडाझुडपांमुळे परिसराची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT