मुंबई

ठाणे पोलिस कर्मचाऱ्याच्या खात्यात सायबर हॅकिंग

CD

ठाणे पोलिस कर्मचाऱ्याला ८४ हजारांचा सायबर गंडा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ठाणे शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यालाच सायबर गुन्हेगारांने गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिस कर्मचाऱ्याचे ई-मेल व मोबाईल हॅक करून सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन कर्ज काढत तब्बल ८४ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कळवा येथील श्रीवाजेद गुलाब आत्तार (वय ३५) २०१७ पासून ठाणे शहर पोलिस दलात कार्यरत असून सध्या परिमंडळ -१ पोलिस उपायुक्त कार्यालय प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. १० फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता घरी गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एचडीएफसी बँकेकडून आयएमपीएस व्यवहाराचे दोन संदेश प्राप्त झाले. त्यामध्ये ५० हजार व २८ हजार रुपये खात्यातून वळते झाल्याचे नमूद होते. यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी तलावपाळी येथील एचडीएफसी बँक शाखेत चौकशी केली असता, २७ जानेवारी २०२६ रोजी अनोळखी व्यक्तीने त्यांचा मोबाईल व ई-मेल हॅक करून त्यांच्या नावावर ऑनलाईन कर्ज घेतल्याचे समोर आले. तर, खात्यातील उर्वरित ११ हजार ३०० रुपये देखील वापरण्यात आले. तर चोरट्याने ई-मेल आयडीचा वापर करून हॅकिंग केल्याचे दिसून आले. या प्रकरणी सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

SCROLL FOR NEXT