बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईत वाढ
ठाणे शहरात २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्हे आणि अटकसंख्येत मोठी वाढ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अवैध वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी २०२५ या वर्षात विशेष मोहिम उघडली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत आणि अटकेत तब्बल चारपटीने वाढ झाली असून, पोलिसांनी शहराच्या सुरक्षेसाठी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे.
ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळात शहर पोलिसांनी, परकीय नागरिकांवर कारवाईचा बगडा उगारला आहे. त्यानुसार २०२४ या संपूर्ण वर्षात बांगलादेशी नागरिकांविरोधात एकूण २८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कारवाईदरम्यान ५९ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. मात्र, २०२५ वर्षात कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्याने एकूण ११६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २२७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आकडेवारीवरून शहरात अवैध वास्तव्याविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबविल्याचे दिसून येते.
याशिवाय, पोलिस प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनुसार २८४ रिस्ट्रिक्शन ऑर्डर जारी केल्या असून २७१ डिपोर्टेशन ऑर्डर काढण्यात आल्या आहेत. त्यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये कार्यवाही पूर्ण झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत १३ डिपोर्टेशन ऑर्डर प्रलंबित असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.
विशेष मोहिमेवर भर
ठाणे शहर पोलिसांकडून शहरातील अवैध वास्तव्यास आळा घालण्यासाठी विशेष तपास मोहिम, ओळख पडताळणी आणि गुप्त माहितीच्या आधारे सातत्याने कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. आगामी काळातही ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यांना आसरा देणाऱ्यांवर होतेय कारवाई
अटकेच्या कारवाईनंतर त्या नागरिकांकडे भारतीय नागरिकत्वाविषयी कागदपत्राची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याचे समोर येते. तसेच त्यांच्याकडे भारतात येण्यासाठी लागणारे प्रवासी वैध कागदपत्रे नसल्याचे व त्यांनी अवैध मार्गाने भारत-बांगलादेश सिमेवरून लपत-छपत भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करून विनापरवाना भाडेतत्वावर रहात असल्याचे दिसत आहे. त्यांना आसरा देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
बांगलादेशी कारवाईचा तक्ता
सन दाखल उघड अटक आरोपी
२०२४ २८ २८ ५९
२०२५ ११६ ११६ २२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.