मुंबई

वाड्यात भाजपचे निषेध आंदोलन

CD

वाड्यात भाजपचे निषेध आंदोलन
वाडा, ता.१५ (बातमीदार)ः छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांची तुलना म्हणजे ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टीपू सुलतानशी करणे म्हणजे इतिहासाचा अपमान आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विधानाबद्दल महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या विधानाबद्दल केवळ माफी नव्हे, तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून बडतर्फ करावे, अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली.
या आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, जिल्हाउपाध्यक्ष संदीप पवार, उपनगराध्यक्ष मनीष देहेरकर, नरेश आकरे, शुभांगी उत्तेकर, वाडा शहर मंडल अध्यक्ष स्वप्नील रोठे, कुडूस मंडल अध्यक्ष मोनिष पाटील, सोनाळे मंडल अध्यक्ष संतोष पाटील, सरचिटणीस अर्चना भोईर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भारताचा भव्य-दिव्य इतिहास रुपेरी पडद्यावर ! संजय लीला भन्साळी आणि केतन मेहतांच्या जय सोमनाथ सिनेमाचं पोस्टर रिलीज

SCROLL FOR NEXT