मुंबई

गोलमैदान परिसरात कारमध्ये तरुणाचा मृतदेह

CD

गोलमैदान परिसरात कारमध्ये तरुणाचा मृतदेह
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : उल्हासनगरमधील अत्यंत वर्दळीच्या गोलमैदान परिसरात एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोलमैदान परिसरातील अल्फा मेडिकलजवळ एक कार बऱ्याच वेळेपासून उभी होती. स्थानिक नागरिकांनी कारमध्ये पाहिले असता, चालकाच्या सीटवर एक युवक मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

संबंधित कार कल्याण नोंदणी क्रमांकाची (एमएच-०५) असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, मृत तरुणाचा मोबाईल फोन मिळून आला आहे; मात्र तो स्विच ऑफ असल्याने त्याची ओळख पटवण्यात सुरुवातीला अडचणी येत होत्या. आता पोलिस वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून मृत तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उल्हासनगर पोलिस करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Assam Congress Political Drama : निवडणुकीच्या आधी आसाम काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी!, दिग्गज नेत्याने काही तासांत राजीनामा घेतला मागे...

Yoga For Stress: सततच्या ताणामुळे कॉर्टिसोल वाढतंय? 'ही' सोपी योगासने टेन्शनही करतील दूर अन् हृदयही ठेवतील निरोगी

Latest Marathi News Update : १८ तारखेला रोहित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद, विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशनचा दुसरा अंक

Severe Night Sweats: रात्री घामाने भिजता? ‘नाइट स्वेट’ची लक्षणे ओळखा, वेळेत घ्या उपचार!

SCROLL FOR NEXT