कामगार सेनेकडून संत सेवालाल महाराज जयंती
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : संत सेवालाल महाराज यांची जयंती शिवसेना कामगार सेना यांच्या वतीने वाशी येथे नाका कामगारांच्या सहभागातून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कामगार नेते व जिल्हाध्यक्ष प्रदीप बी. वाघमारे, माजी नगरसेवक मनोहर जोशी तसेच उपजिल्हाप्रमुख दीपक सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बंजारा कामगारांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली. समाजाने त्यांच्या विचारांवर चालत शैक्षणिक व व्यावसायिक प्रगती साधली असून आज बंजारा समाजातील तरुण मोठ्या पदांवर पोहोचत असल्याचे प्रदीप वाघमारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
जयंती कार्यक्रमासाठी वाशी कामगार नाका परिसरातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक चव्हाण, राजेश पारवे, अनिल रानबावळे, लक्ष्मण राठोड, प्रकाश चव्हाण, राजू राठोड, विलास जाधव, गजानन जाधव, बसू राठोड व सुनील पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.