मुंबई

टिपू सुलतानचा मुद्दा पेटणार

CD

टिपू सुलतानचा मुद्दा पेटणार
मिरा रोडमधील चौकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव
भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा रोड येथील एक चौकाला दिलेले टिपू सुलतानचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने महासभेत आणला आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरामध्येही या मुद्द्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मालेगाव महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रासोबतच टिपू सुलतानाचे छायाचित्र लावण्यात आले होते. यावरून भाजपने आंदोलन सुरू केले आहे. ही घटना ताजी असताना मिरा- भाईंदर महापालिकेत टिपू सुलतानच्या नावाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मिरा रोड येथील प्रभाग क्र.९ मधील उड्डाणपूल ते लोढा पार्क या रस्त्यावरील चौकाला २०१६ मध्ये टिपू सुलतान चौक असे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे, महासभेत भाजपची सत्ता असतानाही सर्व सहमतीने नामकरणाचा प्रस्ताव संमत झाला होता. मात्र, नाव बदलण्याचा प्रस्ताव भाजपने पुन्हा महासभेपूढे आणला आहे.
---------------------------
वादळी चर्चेची शक्यता
- शहरातील कोणत्याही चौकाला, रस्त्याला अथवा वास्तूला नाव देण्याचा अधिकार महासभेला आहे. त्यानुसार महासभेत चौकाला टिपू सुलतान नाव देण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला होता. एकदा नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नाव बदलण्याचे प्रस्ताव महासभेपूढे आले आहेत.
- २०२१ मध्ये महासभेने मंजूर केलेली नावे बदलण्यात येऊ नयेत, असा निर्णय घेतला होता. पालिकेत भाजपची सत्ता असताना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे १८ फेब्रुवारीला होणाऱ्या महासभेत पुन्हा नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून वादळी चर्चा होण्याची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT