मुंबई

महिलांसाठी ‘सरस’चे व्यासपीठ

CD

महिलांसाठी ‘सरस’चे व्यासपीठ
पालघरमध्ये बचत गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन
पालघर, ता. १६ (बातमीदार)ः उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघरच्या विद्यमाने ‘मिनी सरस २०२६’ अंतर्गत विविध उत्पादनांचे भव्य प्रदर्शन शिरगाव बीच येथे होणार आहे. या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, घरगुती मसाले, ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यातील ७३, रत्नागिरी १२, ठाणे ७, रायगड ५, पुणे २ तसेच नाशिक, जळगाव, कोल्हापूर जिल्ह्यांतील १०२ स्वयंसहाय्यता समूहांचा या उपक्रमात सहभाग राहणार आहे. यामध्ये साधारणपणे ८० स्टॉल हस्तकला व इतर उत्पादनांचे, तर २० स्टॉल खाद्यपदार्थ विक्रीचे आहेत. त्याचप्रमाणे स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष व आरोग्य कक्षाचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांना उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
------------------------------------
१५ ते २० लाखांची उलाढाल
- या प्रदर्शनांमध्ये दरवर्षी साधारणतः १५ ते २० लाख रुपयांची विक्री झाली असून, सुमारे १०,००० ते २०,००० नागरिकांनी भेट दिली होती. यंदा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन उपक्रम ग्लोबल कोकण महोत्सवासोबत संयुक्तपणे होत असल्याने महोत्सवाला मुंबई परिसरात मोठी ओळख आहे.
- दरवर्षी साधारणतः एक ते दोन लाख नागरिक ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट देत असल्याने महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्याची तसेच महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या उत्पादनांना स्वतःचा ग्राहकवर्ग निर्माण करण्याची संधी उपलब्ध आहे.
-----------------------------
स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण शासनाचे महत्त्वाचे ध्येय असून, प्रदर्शनाच्या उद्घाटनास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची खरेदी करून प्रोत्साहन द्यावे.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT