डहाणूकरांना १५ डब्यांच्या लोकलची प्रतीक्षा
प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली, प्रवाशांचे एप्रिलच्या नव्या वेळापत्रकाकडे लक्ष
पालघर, ता. १६ (बातमीदार) : उमरोळी आणि सफाळे रेल्वे स्थानक येथील प्लॅटफॉर्म लांबीचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आता डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल सुरू करण्याच्या मागणीला जोर वाढला आहे. याबाबत रेल्वे प्रशासन डहाणूसाठी १५ डब्यांच्या रेल्वेची घोषणा कधी करते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
सफाळे स्थानकातील फाटकामुळे दोन भागांत विभागलेला प्लॅटफॉर्म एकत्रित करून पूर्ण लांबीचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. आता या प्लॅटफॉर्मवर २० डब्यांच्या मेमूपेक्षाही मोठी गाडी उभी राहू शकते. महत्त्वाचे म्हणजे, वैतरणा ते डहाणू यादरम्यान वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता या मार्गावर १५ डब्यांची सेवा अत्यावश्यक झाल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांनी १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान लोकल फेऱ्या वाढविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता गुरुवार (ता. १९) पासून १२ वातानुकूलित आणि तीन नवीन सर्वसाधारण लोकल सुरू करण्यात येत आहेत. यात डहाणू विभागातील फेऱ्यांबाबत अपेक्षित वाढ न झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकतेच पश्चिम रेल्वे मार्गावर चार फेऱ्यांची वाढ झाली असून, एप्रिलमधील नव्या वेळापत्रकात ही फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तसे असले तरी या वेळापत्रकात डहाणू मार्गावरील १५ डब्यांच्या लोकलबाबत स्पष्टता नसल्याची माहिती प्रवासी संघटनांनी दिली. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्याचे सांगितले जाते. मात्र, एवढे असूनही प्रत्यक्ष निर्णयाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
---------------
चौकट
रेल्वेकडून प्रवाशांना अपेक्षा
प्लॅटफॉर्मची कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारीअखेर डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल तातडीने सुरू करावी आणि एप्रिलच्या वेळापत्रकात फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवासी सेवाभावी संस्थेकडून होत आहे. गर्दीच्या त्रासातून दिलासा देण्यासाठी त्वरित कृतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.