मुंबई

संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात

CD

संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात
नेरूळ, ता. १६ (बातमीदार) : करावे गाव येथे सेवालाल समाज परिवर्तन संस्थेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या २७८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपमहापौर दशरथ भगत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
संतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी संत सेवालाल महाराजांनी दिलेला समाजएकता, सेवाभाव व प्रगतीचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत समाजातील सर्व घटकांनी सामाजिक बांधिलकी जपत विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास विविध मान्यवर, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करून पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक ऐक्य, संस्कार व परंपरा जपत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
चौकट
नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
नवी मुंबई महानगरपालिकाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. महापौर सुझाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, सहाय्यक आयुक्त घणसोली वसंत मुंडावरे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव, स्वच्छता अधिकारी राजूसिंह चव्हाण तसेच अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT