मुंबई

वसई-विरार शहरातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवाने बाबत स्थगिती देण्यात यावी*

CD

‘रिक्षा, टॅक्सी परवान्यांना स्थगिती द्या’
विरार (बातमीदार) ः वसई-विरार शहरात वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर महापौर अजीव पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून नवीन रिक्षा, टॅक्सी परवाने देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. नवनिर्माण रिक्षा- टॅक्सी- टेम्पोचालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष नारायण घाडी यांनी महापौरांना निवेदन सादर केले. या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम, कार्यकर्ता संदीप होडगे उपस्थित होते. निवेदनात शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, अनधिकृत रिक्षाथांबे आणि अरुंद रस्त्यांवरील वाहनांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शहरातील रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच नवीन रिक्षा नोंदणीच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यात वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Jayanti 2026 : शिवनेरीवर शिवभक्तांची अलोट गर्दी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार

Farmers Protest:अदानींच्या निवकणे जलविद्युत प्रकल्पाला विरोध; बाधित गावांतील शेतकरी आक्रमक; हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ!

मोठी बातमी! प्राध्यापक भरती आता ६०:२०:२० च्या निकषांनुसार; तिसऱ्यांदा बदलले निकष; अर्जदार उमेदवारांना पुन्हा करावा लागणार अर्जात बदल, वाचा...

Shivjayanti : शिवनेरीवर आज रंगणार शिवजन्मसोहळा; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

Shiv Jayanti 2026 Wishes: शौर्य, निष्ठा आणि प्रजाहितक्षम नेतृत्व! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अशा द्या मराठी शुभेच्छा अन् संदेश

SCROLL FOR NEXT