मुंबई

हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी नमुंमपा ने कंबर कसली

CD

हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेने कसली कंबर
चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश
वाशी, ता. १९ (बातमीदार) ः नवी मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने आता कंबर कसली आहे. यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना आखल्या असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिक कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सोमवारी (ता. १६) घेण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत दिले.
शहरात सध्या खासगी आणि सरकारी प्राधिकरणांमार्फत मिळून ७०० हून अधिक छोटी-मोठी बांधकामे सुरू आहेत. या सर्व साईट्सवर मानक कार्यप्रणालीचे पालन होतेय की नाही, याची विभाग अधिकारी स्तरावर चार दिवसांत पाहणी करून अहवाल सादर करण्याची मुदत दिली. तसेच, मानक कार्यप्रणालीचे पालन होत नसल्यास काम बंद करावे व त्यानंतरही सुधारणा न केल्यास बांधकाम परवानगी प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, अशी नोटीस देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. आकाराने छोट्या-मोठ्या अशा सर्वच बांधकाम साईट्सवर हवा गुणवत्तादर्शक यंत्रे बसविणे व त्याचा तपशील अ‍ॅपवर इंटीग्रेटेड करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निेर्देश आयुक्तांनी दिले.

बांधकाम साहित्य झाकून नेण्याच्या सूचना
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जड वाहनांमध्ये वाहून नेले जाणारे बांधकाम साहित्य पूर्णपणे झाकून नेले जात असल्याबद्दल नियमित खातरजमा करण्यात यावी. तसेच, डेब्रिज नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी असलेल्या सी अँड डी वेस्ट प्लान्टमध्येच शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी नेले पाहिजे, असे निर्देशित करण्यात आले. तसेच बांधकाम साहित्य व डेब्रिज वाहून नेणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT