आवक वाढली, भाजीपाला स्वस्त
घाऊक बाजारातील भाव घसरले; किरकोळ बाजारातही ग्राहकांना दिलासा
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : मुंबईच्या घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाज्यांच्या भावात मोठी घट झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या घाऊक बाजारात कोबी सहा ते आठ रुपये प्रतिकिलो, तर फ्लॉवर १० ते १६ रुपये प्रतिकिलो भावाने विकला जात आहे.
हिवाळ्यातील अनुकूल हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन चांगले झाले आहे. यंदा पावसाळा लांबल्याने आणि हिवाळा उशिरा सुरू झाल्याने भाजीपाल्याची आवक उशिरा झाली. डिसेंबरपासून अपेक्षित असलेली आवक जानेवारी अखेरीपासून वाढू लागल्याने बाजारात आता ताज्या हिरव्या भाज्यांची मुबलक उपलब्धता झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेशातूनही हिरव्या वाटाण्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दररोज सुमारे ३० ते ३५ गाड्या मटार बाजारात दाखल होत असल्याने भाव खाली आल्याची माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली.
किरकोळ बाजारातही दिलासा
घाऊक बाजारातील भाव कमी झाल्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे. बहुतांश भाज्या ५० ते ८० रुपये प्रतिकिलोदरम्यान उपलब्ध असल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
घाऊक बाजारातील सध्याचे भाव
भाजी प्रतिकिलो भाव
भोपळा १० ते १४ रुपये
चवळी शेंग १० ते ३० रुपये
फरसबी १६ ते २४ रुपये
गाजर व घेवडा १६ ते २० रुपये
पडवळ २० ते ३६ रुपये
शिराळा-दोडका २६ रुपये
वालवड १८ ते २० रुपये
वांगी २० ते २४ रुपये
टोमॅटो १५ ते १८ रुपये
हिरवा मटार २२ ते २४ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.