मुंबई

तुर्भे गावात आट्या-पाट्यांचा पुन्हा रंग

CD

तुर्भे गावात ‘आट्या-पाट्या’ पुन्हा रंगात
पारंपरिक स्वदेशी खेळामुळे उत्साह
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबईतील तुर्भे गावात पारंपरिक आणि रोमांचकारी स्वदेशी खेळ आट्या-पाट्या पुन्हा एकदा रंगात आला असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत हा खेळ सुरू केला आहे. दररोज सायंकाळी गावातील मैदानावर खेळाडू व प्रेक्षकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
ग्रामीण संस्कृतीची ओळख असलेला आट्या-पाट्या हा महाराष्ट्रातील जुना सांघिक मैदानी खेळ असून कोकण पट्टा व ग्रामीण भागात सणांच्या काळात विशेषतः खेळला जातो. तुर्भे गावातही अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली गेली असून नव्या पिढीकडून ती पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे.
या खेळात दोन संघांमध्ये प्रत्येकी नऊ खेळाडू असतात. मैदानावर आखलेल्या पाट्यांमध्ये एका संघातील खेळाडू ‘लोण’ म्हणून उभे राहतात, तर दुसऱ्या संघातील ‘आट्या’ खेळाडू चपळाई, वेग आणि हुलकावणी देत त्या रेषा पार करण्याचा प्रयत्न करतात. निरीक्षणशक्ती, संतुलन आणि संघभावना या खेळातील महत्त्वाच्या बाबी मानल्या जातात. स्थानिक ज्येष्ठांच्या मते, पूर्वी चांदण्याच्या प्रकाशात आट्या-पाट्यांचे सामने रंगत असत. होळीच्या सणातील हा खेळ गावाच्या सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जात होते. आजही तीच परंपरा जपण्यासाठी तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत आहे.


तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुर्भेतील युवक मंडळांनी स्पर्धात्मक सामने आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्वांचा सहभाग वाढत असून मोबाईल व डिजिटल मनोरंजनाच्या युगात पारंपरिक खेळांकडे युवक वळत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. आट्या-पाट्यांसारखे मैदानी खेळ शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्याबरोबरच शिस्त, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी विकसित करतात. त्यामुळे अशा खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. तुर्भे गावात पुन्हा सुरू झालेल्या या खेळामुळे पारंपरिक संस्कृतीला नवे जीवन मिळाले असून आगामी होळी सणात सामन्यांची रंगत आणखी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

Santosh Deshmukh Case: खटल्यातील विलंबामुळे सरकारी पक्षाला तंबी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

Solapur Dhule Highway Accident: चार दिवसांपूर्वी साखरपुडा, परीक्षेसाठी लातूरला निघाले अन् काळाने गाठले

Ramadan 2026: रमजानमध्ये इबादत, शांती आणि सवाबाचा अनुभव घ्यायचा आहे? भारतातील 'या' मशिदींना नक्की भेट द्या

Latest Marathi News Live Update : काही तपासण्या करण्यासाठी शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलला आणलंय : सुप्रिया सुळे

SCROLL FOR NEXT