तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध
उरणमध्ये सेझपेक्षाही मोठ्या लढ्याचा इशारा
उरण, ता. १९ (वार्ताहर) ः राज्य मंत्रिमंडळाने तिसऱ्या मुंबईसाठी जमीन संपादनाचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए केएससी नवनगरविरोधी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला असून, एसईझेडपेक्षाही मोठा लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने तिसऱ्या मुंबईसाठी साडेबावीस टक्क्यांचे तत्त्व अवलंबून जमीन संपादनाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला केएससी नवनगरविरोधी समितीने तीव्र विरोध केला असून, बाधित सर्व ग्रामपंचायतींमध्ये ठराव पारीत करून शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, रायगड जिल्हा परिषद व उरण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांनीही या भूसंपादनाविरोधात सरकारला निवेदन सादर करावे, अशी मागणी करण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे जमिनीसोबत येथील स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांची घरे, गावे उद्धवस्त होतील, असे समितीने म्हंटले आहे. तर, शेतकऱ्यांच्या शेती वाचविण्यासाठी मोठा लढा दिला केला जाईल, असे समितीचे सरचिटणीस रुपेश पाटील यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.