मुंबई

ठाण्यात नववर्ष स्वागत यात्रेत वारकरी–धारकरी संगमाचा अनोखा देखावा

CD

ठाण्यात वारकरी-धारकरी संगमाचा अनोखा देखावा
नववर्ष स्वागत यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात
ठाणे, ता. १८ (बातमीदार) : भारतीय नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर यंदा ठाणे शहरात सांस्कृतिक, पारंपरिक आणि देशभक्तीपर संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. येऊर परिसरातील गावकरी, धारकरी आणि वारकरी परंपरेचा संगम मल्लखांबच्या माध्यमातून सादर केला जाणार असून, या अनोख्या देखाव्याची उत्सुकता वाढली आहे.
येऊरमधील एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने पलातीचा मल्लखांबाचे प्रात्यक्षिक चित्ररथावर सादर केले जाणार आहे. आदिवासी पाड्यातील मुले ही वारकरी आणि धारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषेत कसरती सादर करतील. देशाच्या जडणघडणीत वारकरी आणि धारकरी या दोन्ही परंपरांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार असल्याची माहिती मंडळाचे किशोर म्हात्रे यांनी दिली.
नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनासंदर्भात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांची बैठक श्रीराम व्यायामशाळा येथे पार पडली. बैठकीत विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सहभागाची माहिती दिली. डोंबिवली येथील स्वागत यात्रा संयोजकांनीही उपस्थित राहून ठाण्यातील नियोजनाची माहिती घेतली. डोंबिवलीतील समिती प्रमुख अमेय काटदरे यांनी राज्यभर एकाच विषयावर स्वागत यात्रा झाल्यास विचार अधिक व्यापक स्तरावर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. विश्वस्त संजीव ब्रम्हे यांनी त्यास दुजोरा देत डोंबिवलीतील पहिल्या स्वागत यात्रेची आठवण करून दिली.

१४ उपयात्रांचे सादरीकरण
घंटाळी मित्र मंडळाच्या योग विभागासह कच्छ समाज, सरस्वती जिम्नॅस्टिक सेंटर, तेली समाज, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, ब्राह्मण शिक्षण मंडळ, कलांकुर आर्ट फाउंडेशन आणि बंजारा समाज यांचा सहभाग यंदा लक्षवेधी ठरणार आहे. कर्तव्यदक्ष, वंदे मातरम् यांसारख्या विविध थीमवर आधारित चित्ररथ आणि प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात १४ उपयात्रांचे आयोजन करण्यात येणार असून, ब्रह्मांड परिसर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, कळवा आणि वागळे इस्टेट या भागांत या उपयात्रा पार पडणार आहेत. नववर्षाचे स्वागत सांस्कृतिक ऐक्य आणि सामाजिक संदेश देत उत्साहात साजरे करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT