मुंबई

सांघिक कामगिरीची फलश्रुती

CD

सांघिक कामगिरीची फलश्रुती
पनवेलला सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांकाचा मान

पनवेल, ता. १८ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा आपली भक्कम छाप उमटवत ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये अमृत गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सलग दुसऱ्यांदा मिळालेला हा बहुमान म्हणजे पालिकेतील विविध विभागांच्या समन्वयित आणि नियोजनबद्ध कामगिरीचे फलित मानले जात आहे.
राज्यात २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ या अभिनव उपक्रमांतर्गत निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरण संवर्धनाची स्पर्धा घेण्यात येते. अभियानाच्या प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म नियोजन, सातत्यपूर्ण आढावा बैठक आणि अचूक अहवाल सादरीकरणामुळे पनवेलची कामगिरी राज्यपातळीवर अधोरेखित झाली. प्रत्येक उपक्रमाचे छायाचित्र, आकडेवारी व परिणाम यांचे शास्त्रशुद्ध सादरीकरण केल्याने गुणांकनात मोठी भर पडली. या यशामागे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा ठरला. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील सुसंवादामुळे पर्यावरणपूरक उपक्रमांना व्यापक प्रतिसाद मिळाला.

वृक्षारोपण व घनकचरा व्यवस्थापन
भूमी घटकांतर्गत व्यापक वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला. ओला-सुक्या कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, कंपोस्टिंग प्रकल्प आणि हरित पट्ट्यांची निर्मिती प्रभावीपणे राबविण्यात आली. या उपक्रमांत स्वरूप खारगे व डॉ. वैभव विधाते यांनी विशेष समन्वय साधला.

जलसंधारण व पुनर्वापर
जल घटकांतर्गत पर्जन्यजल संधारण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, मलनिस्सारण व्यवस्था आणि पाणी पुनर्वापर यावर भर देण्यात आला. संजय कटेकर, डॉ. वैभव विधाते व विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारण प्रकल्प प्रभावीपणे राबविले गेले.

प्रदूषण नियंत्रण व जनजागृती
वायू घटकांतर्गत प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, प्लास्टिकमुक्ती मोहिमा आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. स्वरूप खारगे व डॉ. वैभव विधाते यांनी या उपक्रमांवर देखरेख केली.

ऊर्जा संवर्धन
ऊर्जा बचत, हरित ऊर्जा वापर आणि ऊर्जा कार्यक्षमतेविषयी उपक्रम राबविण्यात आले. संजय कटेकर व प्रीतम पाटील यांनी ऊर्जा संवर्धनाच्या प्रकल्पांत सक्रिय सहभाग नोंदविला.

हरित संवर्धन व दस्तऐवजीकरण
आकाश घटकांतर्गत शाश्वत विकास, हरित उपक्रमांचे सुसूत्र दस्तऐवजीकरण आणि प्रभावी सादरीकरणावर भर देण्यात आला. अभिषेक पराडकर व स्वरूप खारगे यांनी या घटकांत विशेष कामगिरी बजावली.

माझी वसुंधरा अभियानामध्ये अमृत गटात सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही पनवेल पालिकेसाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ मोहीम नसून, ती आपली सामूहिक जबाबदारी आहे. आगामी काळातही अधिक व्यापक आणि शाश्वत उपक्रम राबवून पनवेलला हरित व पर्यावरणपूरक शहर म्हणून अधिक सक्षम बनवू.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रण या क्षेत्रांत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. प्रत्येक उपक्रमाचे अचूक दस्तऐवजीकरण आणि परिणामकारक सादरीकरण यामुळे पनवेलची कामगिरी राज्यपातळीवर ठळकपणे समोर आली. भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अधिक नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवले जातील.
- वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका

अभियानाच्या प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म नियोजन, नियमित आढावा आणि विभागांमधील समन्वय यावर आम्ही विशेष भर दिला. वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन, प्लॅस्टिकमुक्ती आणि जनजागृती या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही कामगिरी संपूर्ण पालिका प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांचे यश आहे.
- स्वरूप खारगे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT