मुंबई

शिवरायांचा, शस्त्रांचा इतिहास जपणारे ‘गजाई आर्टस्’

CD

शिवराय, शस्त्रांचा इतिहास जपणारे ‘गजाई आर्टस्’
कोपरखैरणेतील दालनात मिनीएचर शस्त्रांची अनोखी परंपरा; शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बेलापूर, ता. १८ : जगभरात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकांचे आयोजन होत असताना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे ‘गजाई आर्टस्’ हे दालन शिवकालीन इतिहास जतन करण्याचे वेगळे कार्य करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध शैलीतील सुबक मूर्ती, मावळ्यांच्या प्रतिकृती, भवानी तलवारीचे नमुने तसेच अवघ्या इंचभर आकारातील शस्त्रांची मिनीएचर येथे पाहायला मिळतात. ऐतिहासिक धाटणीचे इंटेरियर आणि शस्त्रसंपदेची मांडणी यामुळे दालनात प्रवेश करताच शिवकालीन वातावरणाचा प्रत्यय येतो. नवी मुंबईसह पनवेल, रायगड, ठाणे आणि मुंबई येथून शिवप्रेमी या कलाकृतींना मोठी मागणी करीत आहेत.
या दालनातील सर्व शस्त्रांचे मिनीएचर दालनाचे प्रमुख कुमार खोपडे स्वतः तयार करतात. मराठा धोप तलवार, वक्र धोप, खंडा, पट्टा, तेगा, सोसन पट्टा अशा विविध शस्त्रांच्या फ्रेम ते घडवतात. शिवप्रेमींच्या मागणीनुसार विशेष ऑर्डरही स्वीकारल्या जातात. शिवरायांचा इतिहास जपणे हे आपले कर्तव्य समजून ही सेवा करीत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
चौकट
इतिहास जतन
‘गजाई आर्टस्’ हे केवळ दालन नसून, शिवकालीन शौर्य, संस्कृती आणि परंपरेची जपणूक करणारे प्रेरणास्थान ठरत आहे. शस्त्रांचे मिनीएचर आणि ऐतिहासिक कलाकृतींच्या माध्यमातून तरुण पिढीला शिवरायांचा पराक्रम आणि स्वराज्याची संकल्पना समजावून सांगण्याचे कार्य येथे होत आहे. वाढती मागणी पाहता भविष्यात अशा ऐतिहासिक दालनांची गरज अधिक भासणार असून, इतिहास जिवंत ठेवण्यासाठी ही चळवळ महत्त्वाची मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT