ठाण्यात ‘शिवसन्मान ज्योत’ यात्रा
ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष
ठाणे, ता. १९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य, त्यांची धर्मनिष्ठा आणि लोककल्याणाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ठाणे शहरात ‘शिवसन्मान ज्योत यात्रा’ मोठ्या उत्साहात पार पडली. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण ठाणे नगरी दुमदुमली होती. यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा न करता, केवळ शिवसन्मान ज्योत यात्रा आणि बाइक रॅली काढून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
शिवरायांच्या विचारांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसन्मान ज्योत यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही यात्रेची सुरुवात गुरुवारी (ता. १९) सकाळी ८.१५ वाजता तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करत ढोल-ताशांच्या गजरात, लेझिमच्या तालावर उत्साही वातावरणात यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत सुमारे ५०० हून अधिक शिवभक्त सहभागी झाले होते. महिलांनी नऊवारी साड्या, तर पुरुषांनी कुर्ता, गांधी टोपी आणि भगवे फेटे परिधान करून शिवरायांना अभिवादन केले. ढोल-ताशांचा गजर, लेझिमचा ताल आणि शिवरायांचा भव्य रथ हे या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. तरुण आणि बालकांनी ठिकठिकाणी रथासोबत फोटो आणि रील काढून सोशल मीडियावर शिवजन्मोत्सवाचा आनंद साजरा केला. ही यात्रा तलावपाळी येथील अश्वारूढ पुतळ्यापासून सुरू होऊन चिंतामणी चौक, टेंभी नाका, माजीवाडा, कापूरबावडी, हिरानंदानी इस्टेट आणि मानपाडा यांसारख्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा तलावपाळी येथे समाप्त झाली.
पारंपरिक वेशभूषा
यात्रेत सुमारे ५०० हून अधिक शिवभक्त सहभागी झाले होते. महिलांनी नऊवारी साड्या, तर पुरुषांनी कुर्ता, गांधी टोपी आणि भगवे फेटे परिधान करून शिवरायांना अभिवादन केले. महिलांनी नऊवारी साड्या, तर पुरुषांनी कुर्ता, गांधी टोपी आणि भगवे फेटे परिधान करून शिवरायांना अभिवादन केले. ढोल-ताशांचा गजर, लेझिमचा ताल आणि शिवरायांचा भव्य रथ हे या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले.
ज्योत यात्रेचा मार्ग
तलावपाळी येथून सुरू झालेली ही शिवसन्मान ज्योत यात्रा चिंतामणी चौक, टेंभी नाका, उथळसर नाका, माजीवाडा ब्रिज खालून उजवीकडे, कापूरबावडी, ढोकाळी नाका, हिरानंदानी इस्टेट चौक, वाघबीळ -कावेसर नाका, हैप्पी व्हेली, इडन वुड, गांधीनगर नाका, उन्नती गार्डन, शास्त्री नगर, वैतीवाडी, महानगरपालिका चौक, साईबाबा मंदिर डावीकडे या मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ या यात्रेचा समारोप झाला.
यात्रेचा उद्देश
"शिवनेरी किल्ल्यावरून आणलेली ही सन्मान ज्योत शहराच्या विविध भागांत फिरवण्यात आली. अठरा पगड जातींच्या बांधवांनी एकत्र येत या यात्रेचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले. शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.