मुंबई

सानपाडा भुयारी मार्ग प्रकल्पावर नवा वाद

CD

तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : सानपाडा-पाम बीच मार्गावरील प्रस्तावित भुयारी मार्ग प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोड आणि वृक्ष प्रत्यारोपण प्रक्रियेदरम्यान नोंदविण्यात आलेल्या अनेक हरकती बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुनावणी नोटीस देण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना संबंधित हरकतदारांनीच ‘आम्ही कोणतीही हरकत नोंदवलेली नाही’, असे सांगत पत्र स्वीकारण्यास नकार दिल्याने या प्रकरणात संशय निर्माण झाला आहे.

सानपाडा पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी मोराज सर्कल हा एकमेव मार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही समस्या सोडविण्यासाठी पाम बीच मार्गावरील सेक्टर १९ येथे भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमहापौर दशरथ भगत यांनी प्रशासनासोबत तब्बल १२ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. या कामामुळे एकूण ४४० झाडे बाधित होणार असून, त्यापैकी १११ झाडे तोडली जाणार, तर ३२९ झाडांचे वृक्षतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यारोपण केले जाणार आहे. दरम्यान, या प्रकारामुळे वृक्षतोड प्रक्रियेची पारदर्शकता, हरकत नोंदणी प्रणाली आणि प्रशासनावर होणारा संभाव्य दबाव या मुद्द्यांवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

३८ हरकतींवर संशय
वृक्षतोड व स्थलांतर प्रस्तावावर सुमारे ३८ पर्यावरणप्रेमींनी हरकती नोंदवल्याची नोंद प्रशासनाकडे होती. तुर्भे विभाग कार्यालयात सुनावणी निश्चित करून हरकतदारांना नोटीस देण्यासाठी कर्मचारी गेले असता अनेकांनी अशा कोणत्याही हरकतीबाबत माहिती नसल्याचे सांगितले. काहींनी सुनावणी पत्र स्वीकारण्यासही नकार दिला. यामुळे या हरकती खऱ्या आहेत की, कोणीतरी बनावट नावे वापरून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काहींकडून हे प्रकरण राजकीय विरोधातून घडवले गेले का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वीही प्रकार
वाशी सेक्टर १७ ते कोपरी गावदरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलासाठी जून २०२२ मध्ये हजाराहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्या वेळी तपासात सुमारे ४०० पेक्षा अधिक हरकती बनावट असल्याचे समोर आले होते.

सानपाडा भुयारी मार्गातील बाधित झाडांबाबत आलेल्या हरकतींवर सुनावणीसाठी उपस्थित राहावे म्हणून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, मात्र काही नागरिकांनी अशी हरकत घेतली नसल्याचे सांगत पत्र स्वीकारले नाही. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर चर्चा करून पुढील योग्य कार्यवाही केली जाईल.
- सागर मोरे, सहाय्यक आयुक्त, तुर्भे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT