मुंबई

गोकुळधाम पतसंस्थेची भावांजली

CD

गोकुळधाम पतसंस्थेची अर्जुन लोके यांना आदरांजली

शिवडी, ता. १९ (बातमीदार) : गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम वसाहतीतील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तातू लोके यांचे रविवारी (ता. ८) निधन झाले. गोरेगाव पूर्व येथील वसाहतीत गोकुळधाम पतसंस्थेच्या रूपाने सहकारी चळवळ राबविण्यात पुढाकार घेणारे अर्जुन लोके यांना मंगळवारी (ता. १७) गोकुळधाम पतसंस्थेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. या वेळी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
पतसंस्थेचे अध्यक्ष काशिनाथ माटल म्हणाले, की अर्जुन लोके यांनी आपल्या तळमळीच्या सामाजिक कामातून, मग राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सेक्रेटरीपद असेल, डॉ. शिरोडकर विद्यालयासंबंधित क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्षपद असेल किंवा अनेक संस्था संघटना असतील येथे असामान्य व्यक्तिमत्त्व घडवले. असे असले तरी ते नेहमीच सामान्य जीवन जगले, म्हणूनच ते अनंतकाळ लोकांच्या स्मरणात राहतील. या वेळी उपाध्यक्ष अनंत शिंदे, संचालक गोविंद आजगावकर, लक्ष्मण भेलसेकर, नागेश भांडे, आदिती परब यांची श्रद्धांजली वाहणारी भाषणे झाली. तर पतसंस्थेच्या व्यवस्थापक जया चव्हाण, संस्थेचे सेक्रेटरी श्रीपाद दिवेकर, खजिनदार शिवाजी खरात यांनीही अर्जुन लोके यांना आदरांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT