मुंबई

बाजारपेठेतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी व्यापाऱ्यांना पोलिसांचे आवाहन

CD

बाजारपेठेतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी व्यापाऱ्यांना पोलिसांचे आवाहन
गर्दीच्या वेळेत माल चढ-उतार बंद ठेवा; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा
मुरूड, ता. १९ (बातमीदार) : मुरूड शहरातील मुख्य बाजारपेठेत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे व रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे केले आहे. दुकानदारांनी माल उतरविणारी वाहने रस्त्यावर उभी न करता नियोजित जागेत व कमी वेळेत मालाची चढ-उतार करावी, तसेच गर्दीच्या वेळेत हा प्रकार पूर्णतः बंद ठेवावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकट
नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई
वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८, मुंबई पोलिस अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार दंड, वाहन जप्ती आणि कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सार्वजनिक हितासाठी वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पत्रकाचे वितरण शहर वाहतूक पोलिस नाईक किशोर बाढारे, विनायक चांदोरकर व कल्पेश पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT