मुंबई

नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू

CD

सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरू
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचा वसुलीसाठी निर्णय

डोंबिवली, ता. १९ ः कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीला गती देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नोकरदार वर्गाची सोय लक्षात घेऊन पालिकेच्या मुख्यालयासह सर्व १० प्रभाग क्षेत्रांतील नागरी सुविधा केंद्रे शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सर्व केंद्रे सुट्टीच्या दिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सुरू राहतील. अनेक नागरिकांना कार्यालयीन वेळेमुळे कामाच्या दिवसांत कर भरणे शक्य होत नाही, तसेच काहींना ऑनलाइन पेमेंटमध्ये तांत्रिक अडचणी येतात. अशा नागरिकांना आता सुट्टीच्या दिवशी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन आपला कर भरता येईल.

थकबाकीदारांवर जप्तीची टांगती तलवार
एकीकडे सवलती देत असतानाच, दुसरीकडे महापालिकेने थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत २३६ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या असून ३९ जणांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांच्यावर मालमत्ता जप्ती आणि लिलावाची कारवाई प्रस्तावित आहे.

दोन टक्के दंडाचा इशारा
मालमत्ता कर उपायुक्तांनी आवाहन केले आहे, की नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा नागरी सुविधा केंद्रात येऊन त्वरित कर भरावा. विहित मुदतीत कर न भरल्यास दरमहा दोन टक्के विलंब शुल्क (दंड) आकारला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

करदात्यांसाठी सवलतींची संधी
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कर भरणाऱ्यांना पालिकेने विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.
पाच टक्के सवलत : ऑगस्ट २०२५ पर्यंत आगाऊ कर भरणाऱ्यांना
चार टक्के सवलत : सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कर भरणाऱ्यांना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT