कामगार कल्याण केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रदर्शनातून साजरी
शिवडी, ता. १९ (बातमीदार) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र, शिवडी यांच्या वतीने येथील केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या गड-किल्ल्यांवर आधारित आकर्षक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे अविनाश भोंडवे व सुनील शिंदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विरेंद्र सायगावकर यांनी खड्या आवाजात छत्रपतींची गारद सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. या वेळी प्रमुख वक्ते अनंत साळवी यांनी शिवचरित्रावर प्रभावी व्याख्यान देत छत्रपतींच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा वेध घेतला. गड-किल्ल्यांच्या प्रदर्शनाची मांडणी रवींद्र शिंदे यांनी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख भाऊ नाटळकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीडीडी चाळ रहिवासी तसेच संबोधी सामाजिक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थितांनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवजयंतीचा सोहळा आनंदात साजरा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.