मुंबई

अनावश्यक आरसीसी नाल्याच्या निकृष्ट कामाविरोधात तक्रार

CD

अनावश्यक आरसीसी नाल्याच्या निकृष्ट कामाविरोधात तक्रार
तीन कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह; चौकशी करून काम थांबवण्याची मागणी
नेरूळ, ता. १९ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर ५० परिसरात सुरू असलेल्या अनावश्यक व निकृष्ट दर्जाच्या आरसीसी नाल्याच्या बांधकामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. एनआरआय वसाहतीलगत सिडकोचा नैसर्गिक पाणी निचऱ्याचा नाला अस्तित्वात असतानाही सुमारे तीन कोटी रुपये खर्चून नवीन नाला उभारण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित भूखंड हा डेव्हलपमेंट इंजिनिअर सेक्टर ५० चा असून, त्या ठिकाणी नाल्याची कोणतीही गरज नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या कामाबाबत पूर्वी हरकती नोंदवूनही कामाला मंजुरी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अनावश्यक व निकृष्ट दर्जाचे बांधकाम तत्काळ थांबवावे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्ये या कामाबाबत तीव्र नाराजी असून, महापालिकेने पारदर्शकता राखत योग्य ती दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh resumes visa services: बांगलादेशच्या तारिक रहमान सरकारचा मोठा निर्णय!,भारतासोबत ‘व्हिसा’ सेवा पुन्हा सुरू

IND vs SA Super 8s: द. आफ्रिकेने 'दुखती नस पकडली'! भारताची कोंडी करण्यासाठी नेट्समध्ये 'त्या' गोष्टीवर कसून सराव; काढला हुकूमी एक्का

नितीन गडकरींच्या पीएशी ओळख असल्याचे सांगत फसवणूक; नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने उकळले लाखो रुपये...

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

आईने सोडलं, कळपानं छळलं; तरीही ‘पंच कुन’ला नवं घर मिळालं, पाहा हृदयस्पर्शी Viral Video

SCROLL FOR NEXT