

Petrol Diesel Rates news
esakal
Petrol diesel prices : सध्या देशात पेट्रोल सुमारे १०४ ते १०६ रूपये प्रति लिटर आणि डिझेल ९४ ते ९६ रूपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दरम्यान इराण -अमेरिका युद्धाचे थेट परिणाम सामान्यांच्या खिशाला चटके देण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा फटका लवकरच ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात पेट्रोल सुमारे १८ रुपये तर तर डिझेल तब्बल ३५ रुपयांनी महाग होऊ शकते, त्यामुळे महागाईत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. याचा थेट संबंधित साखळीवर मोठा परिणाम होणार आहे.