ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाईल चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्याचे समोर येत आहे. ऐरोली ते ठाणे प्रवासादरम्यान हर्षल भावसार (वय २५) यांचा तब्बल ५१ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हर्षल भावसार हे बुधवारी (ता. १८) सकाळी ऐरोली रेल्वे स्थानकावरून मूळ गावी जाण्यासाठी ठाणे स्लो लोकलच्या जनरल डब्यात प्रवास सुरू केला. दिघा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी आपला मोबाईल सॅकबॅगच्या पुढील कप्प्यात ठेवून दरवाज्याजवळ उभे राहिले. दरम्यान, लोकल ठाणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर ते खाली उतरल्यावर मोबाईल फोन चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीस गेलेला मोबाईल ५१ हजार ४२४ रुपये किंमतीचा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीला गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.