मुंबई

तळोजा भुयारी मार्गासाठी कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

CD

तळोजा भुयारी मार्गासाठी कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे रेल्वेला पत्र
खारघर, ता. १९ (बातमीदार) : दिवा-पनवेल रेल्वेमार्गावरील तळोजा फेज-१ कडे जाणाऱ्या भुयारी मार्गातील अस्वच्छता, निसरडा रस्ता आणि बंद पथदिव्यांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविले आहे. भुयारी मार्गाच्या स्वच्छता व देखभालीसाठी कायमस्वरूपी कामगार नियुक्त करावेत, अशी मागणी त्यांनी वरिष्ठ अभियंता एस. के. सिन्हा यांच्याकडे केली आहे.
तळोजा फेज-१ मध्ये जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी पादचारीही याच मार्गाचा वापर करतात. मात्र, बहुतांश पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. भुयारी मार्गात वर्षभर जमिनीखालून पाणी झिरपत असल्यामुळे वाहनांच्या टायरसोबत येणाऱ्या धुळीचा चिखल तयार होतो आणि रस्ता निसरडा बनतो. त्यामुळे दुचाकी घसरून किरकोळ अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे.
अपुऱ्या प्रकाशामुळे काही दिवसांपूर्वी चोरी व लुटमारीच्या घटना घडल्याची माहितीही स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. त्यामुळे भुयारी मार्गात उच्च दर्जाचे पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आमदार ठाकूर यांनी दूरध्वनीद्वारेही रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

चौकट
पथदिवे, सीसीटीव्हीची व्यवस्था
तळोजा भुयारी मार्ग हा फेज-१ कडे जाणारा एकमेव मार्ग असून येथे अंधार, चिखल आणि अस्वच्छतेमुळे अपघात व गुन्ह्यांचा धोका वाढला आहे. कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी, कार्यरत पथदिवे व सीसीटीव्हीची व्यवस्था केल्यास नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सोय मोठ्या प्रमाणात सुधारेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT