मुंबई

वीज समस्यांवर उपाययोजनांचा आराखडा तयार

CD

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये वाढत्या वीजबिलांचा प्रश्न, स्मार्ट मीटरवरील तक्रारी आणि वारंवार होणाऱ्या शटडाउनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी पुढाकार घेत थेट व्यापारी प्रतिनिधी आणि महावितरण अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेतली. नागरिकांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्यावर ठोस निर्णय व्हावा, यासाठी आमदारांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. सामान्य माणूस आपल्या तक्रारीसह तुमच्याकडे येतो, तेव्हा त्याचा सन्मान राखून त्याचे म्हणणे ऐका, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला सज्जड इशाराही दिला.

उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत शहरातील विविध वीज समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्या स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिलिंग येत असल्याच्या तक्रारींना प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. २८ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक कार्यालयात स्मार्ट मीटर समस्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे महावितरणकडून जाहीर करण्यात आले. तसेच वाढीव बिल आणि मागील बिलांची प्रत जोडून आमदार कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
नियमित शटडाउनबाबत उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली असता, काही ठिकाणी पालिकेच्या कामांमुळे अडथळे निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात अनावश्यक शटडाउन टाळण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. हिराघाट परिसरातील भूमिगत वाहिन्या टाकताना नियमांचे उल्लंघन होत असल्याची व्यापाऱ्यांनी तक्रार केली. त्यावर अधिकाऱ्यांनी पाहणी करून काम दुरुस्त केल्याचे सांगितले.

आमदारांचे निर्देश
म्हारळ सबस्टेशन सुरू करणे, प्रमुख बाजारपेठांतील वाहिन्या भूमिगत करणे, ओव्हरहेड तारा हटवणे, खराब वाहिन्या दुरुस्त करणे; तसेच काही परिसरात मल्टीमीटर बॉक्स बसविण्याबाबतही आमदारांनी निर्देश दिले. बैठकीत महावितरणकडून जनजागृतीसाठी माहितीपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले. नागरिकांच्या वीज समस्यांवर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT