मुंबई

बोईसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

CD

बोईसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात


बोईसर, ता. १९ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बोईसर परिसर भगवेमय झाले होते. विविध सामाजिक संस्था, मंडळे व स्थानिक संघटनांच्या वतीने दिवसभर मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. हजारो महिला, पुरुष, तरुण व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण होते.
सर्कस मैदान, खेरापाडा येथील बिरसा मुंडा मैदान, मधुर हॉटेल चौक, रेल्वे स्थानक परिसर, त्रिवेदी कंपाऊंड, टाटा हाऊसिंग, ओसवाल वंडर सिटी, सरावली तसेच पास्थळ येथे सकल मराठा समाज, शिवशंभू प्रतिष्ठान, टाटा टाऊनशिप व इतर स्थानिक संस्थांतर्फे विविध कार्यक्रम पार पडले. पहाटे चार वाजता शिरगाव येथील किल्ल्यावरून शिवज्योत आणून महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संध्याकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवे फेटे परिधान केलेल्या नागरिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. मिरवणुकीत लेझीम, दांडपट्टा, तलवारबाजी तसेच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सर्कस मैदानात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सर्कस ग्राउंड येथे आयोजित व्याख्यानात वक्ते नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या ओजस्वी शैलीत शिवचरित्र मांडत उपस्थितांना प्रेरित केले. रात्री उशिरापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी जयंती उत्साहात साजरी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT