मुंबई

पीकअपच्या धडकेत दोन महिला ठार

CD

पीकअपच्या धडकेत
दोन महिला ठार

पालघर, ता. २० ः पालघरमध्ये पिकअप टेम्पोच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवारची सुट्टी असल्याने दोन्ही महिला पालघरचा बाजार करून नंडोरे येथे आपल्या घरी परतत असताना त्यांना पिकअपने मागून जोरदार धडक दिली. त्यात लता नीलेश तरे (४५, पिल्हेर पाडा, नंडोरे) आणि बेबी चंद्रकांत जाधव (६५, नवापाडा, नंडोरे) यांचा जागीच मृत्यू झाला.
नंडोरेकडून नवापाडा परिसरात जात असताना हा अपघात घडला. अपघातग्रस्त पीकअपमध्ये दोघे असून, एक २४ वर्षीय शिकावू चालक पिकअप चालवत होता. लता आणि बेबी या रस्त्याच्या कडेने उजव्या बाजूने चालत होत्या. दरम्यान, शिकाऊ चालक याचे नियंत्रण सुटल्याने भरधाव पिकअपने डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे येऊन दोघा महिलांना मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की त्यात दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर लता यांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात तर बेबी यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शिकाऊ चालकाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT