मुंबई

रेल्वे पार्सलच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक; बुलेट केली लंपास

CD

रेल्वे पार्सलच्या नावाखाली
व्यावसायिकाची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : रेल्वे पार्सल सेवा असल्याचे भासवून एका भामट्याने अपहार केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या वर्तकनगर येथील व्यावसायिकाची तब्बल एक लाख ८० हजारांची दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घडला असून, याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्तकनगर येथील संतोष मिश्रा (४५) हे मिशिरपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहेत. आपल्या गावी जाणार असल्याने संतोष यांनी आपली दुचाकी रेल्वेने पाठवण्यासाठी मंगळवारी (ता. १७) ठाणे रेल्वे कार्यालयात चौकशी केली. चौकशीस गेले असताना कार्यालयाबाहेरील एका अनोळखी इसमाने स्वतःला कार्यालयासंबंधित कर्मचारी असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी संतोष यांना दुचाकी आणण्यास सांगितले. यावर विश्वास ठेवत, संतोष यांनी बुधवारी (ता. १८) दुचाकी त्याच्या ताब्यात दिली. पार्सल शुल्क म्हणून एक हजार ५०० रुपये त्या इसमाने संतोष यांच्याकडून घेतले व त्याची पावती देणार असल्याचे आश्वासनही दिले. मात्र, घटनेच्या काही वेळानंतर त्याच्याशी संतोष यांचा संपर्क होऊ शकला नाही.
स्थानकावर चौकशी केली असता ठाणे रेल्वे स्थानकावर दुचाकी पार्सल सेवा उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यानंतर तक्रारदार यांना त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. संतोष यांनी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली. तसेच अपहार झालेल्या दुचाकीची किंमत साधारण एक लाख ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT