ट्रम्प यांच्याविरुद्ध आंदोलन
करण्याची हिंमत दाखवा!
काँग्रेसचे भाजपला आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपने काळे झेंडे दाखवून आपली ‘औकात’ दाखवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचा व आपल्या पंतप्रधानांचा दररोज अपमान करीत आहेत; पण भाजपच्या एकाही नेत्यात डोनाल्ड ट्रम्पविरोधात एक शब्दही बोलण्याची हिंमत नाही. अमेरिकी दूतावासासमोर आंदोलन करून निषेध करण्याची हिंमत भाजपने दाखवावी, असे आव्हान मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिले आहे.
राहुल गांधी यांनी तथाकथित विश्वगुरू, भाजपचे चाणक्य व भाजपच्या सर्व पिलावळीला घाम फोडला आहे. भाजप नेत्यांच्या स्वप्नातही राहुल गांधीच दिसतात. राहुल यांची एवढी दहशत व भीती त्यांना बसलेली आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपची सर्व यंत्रणा काम करते. परवा एका माथेफिरूने राहुल यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली. अशा कोणत्याही धमक्यांना राहुल गांधी व काँग्रेस कार्यकर्ते भीक घालत नाहीत, असे राजहंस म्हणाले.
भाजपच्या अशा कोणत्याही आंदोलनाला त्याच पद्धतीने काँग्रेस कार्यकर्ते उत्तर देऊ शकतात; पण ती आमची संस्कृती नाही. काँग्रेस ‘मोहब्बत की दुकान’ आहे आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी सर्वांना जोडण्याचा संदेश दिला आहे, तोडण्याचा नाही, असेही राजहंस यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.