मुंबई

प्लास्टिकमुक्त व दुर्गंधीमुक्त गावासाठी प्रशासनाचा ठाम निर्धार

CD

डहाणूत ‘स्वच्छता पंधरवडा’ची उत्साहात सुरुवात
प्लॅस्टिक, दुर्गंधीमुक्त गावासाठी प्रशासनाचा निर्धार

वाणगाव, ता. २१ (बातमीदार) : पंचायत समिती, डहाणूअंतर्गत ‘स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)’च्या माध्यमातून १९ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता पंधरवडा’ मोहिमेचा शुभारंभ ग्रामपंचायत धाकटी डहाणू येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मोहिमेचे उद्‍घाटन गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी) पल्लवी सस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांच्या दुतर्फा, राष्ट्रीय महामार्ग परिसरात, नदी-ओढे, समुद्रकिनारे तसेच गावांतील नाल्यांमध्ये साचणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे वाढणारी अस्वच्छता लक्षात घेऊन ‘प्लॅस्टिकमुक्त, दुर्गंधीमुक्त व स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्याच अभियानाला अधिक गती देण्यासाठी डहाणू तालुक्यात स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छता रॅली, ग्रामसभा, कोपरा सभा तसेच विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय व खासगी कार्यालये, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, बाजारपेठा, बस स्थानके, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे तसेच नदीनाले परिसरातील कचरा साचलेली ठिकाणे यांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीला ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी हिरवी व निळी कचराकुंडी वापरणे बंधनकारक करावे, नियमित कचराउपसा करावा, कंपोस्ट खड्ड्यांद्वारे ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करावे तसेच प्लॅस्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. जमा झालेला प्लॅस्टिक कचरा तालुकास्तरीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे वर्ग करण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.
अभियानादरम्यान साफसफाई पूर्वी व नंतरची छायाचित्रे, जमा झालेल्या प्लॅस्टिक कचऱ्याचा किलोमधील तपशील तसेच दैनंदिन अहवाल तालुका कार्यालयास सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT