मुंबई

सावरकरनगरात पाणीप्रश्न चिघळला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : सावरकर नगर म्हाडा वसाहतीतील पाणीटंचाईचा प्रश्न चिघळत चालल्याने अखेर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. दीर्घकाळापासून अपुरा आणि विस्कळित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ठाकरे गटाने शुक्रवारी (ता. २०) रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिलांनी रिकाम्या घागरी आणि मडकी हातात घेऊन निषेध नोंदवला.
काही महिन्यांपासून सावरकर नगर आणि परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. काही इमारतींमध्ये दोन-दोन दिवस पाणी येत नसल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण्याची धावपळ करावी लागत असून, अनेकांना खासगी टँकरचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक ताणही वाढला आहे. पाणीटंचाईबरोबरच परिसरात कचरा व वाहतूक कोंडीच्या समस्याही गंभीर बनल्या आहेत. संबंधित लोकप्रतिनिधींनी वारंवार आश्वासने दिली, बैठका घेतल्या; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. नवीन पाण्याची टाकी उभारण्याच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला. यापुढे केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नाही, तर ठोस कृतीचीच अपेक्षा असल्याचे रहिवाशांनी स्पष्ट केले.

आश्वासनांची खैरात
वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्याही मोठ्या प्रमाणात आहे. नगरसेवकांकडून केवळ आश्वासने दिली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कृतीत काहीच होत नसल्याचा आरोप यावेळी राजीव शिरोडकर यांनी केला. पाण्याच्या प्रश्नावर केवळ बैठका घेऊन आश्वासनांची खैरात दिली जाते; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याची टीकाही शिरोडकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT