मुंबई

सीआयएसएफ जवानाचा मोबाईल चोरीला

CD

ठाणे, ता. २१ : ठाणे रेल्वे स्थानकावर एका एसआरपीएफ जवानाचा महागडा मोबाईल चोरट्याने लांबवल्याची नुकतीच घडली आहे. ही घटना ताजी असताना लोकलच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाचा महागडा मोबाईल लंपास केल्याची घटना पुन्हा घडली. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बदलापूर (पूर्व) येथील रहिवासी असलेले तक्रारदार हर्षल हंकारे (वय २६) हे सीआयएसएफमध्ये कार्यरत असून सध्या उत्तर प्रदेश येथे कर्तव्यावर आहेत. १८ फेब्रुवारीला कामानिमित्त ते ठाणे येथे आल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी सायंकाळी ५.१० वाजता ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ५ वरून डाउन कर्जत जलद लोकलमध्ये चढत होते.
यावेळी पुरुषांच्या डब्यातील गर्दीतून आत प्रवेश करताना त्यांच्या खिशातून मोबाईल चोरीला गेला आहे. हा मोबाईल ४० हजार ९९९ रुपये किमतीचा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

Leopard Rescue Chalisgaon : शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पण शेतकऱ्याच्या एका फोनमुळे वाचले आयुष्य; चाळीसगावातील रेस्क्यूचा असा झाला शेवट

Beed News: बीडमध्ये उष्णतेचा कहर; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट; तापमान ४२°C; शहरात उन्हाचा कडाका पाहायला मिळाला

इंडिया आघाडीच्या एकजुटीने मोदी सरकारची उडाली झोप, मोदी-शहांना आता विरोधकांत फुटीची आशा

SCROLL FOR NEXT