मुंबई

शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग

CD

शिवजयंतीनिमित्त पदयात्रा व सांस्कृतिक सोहळा उत्साहात
शिवडी, ता. २१ (बातमीदार) ः मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) सायन पश्चिम येथील जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यामध्ये गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी मोलाचा सहभाग नोंदविला.
जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गुरुकुल कृती फाउंडेशनचे संस्थापक उमेश मुरकर आणि त्यांच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमात नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन व समन्वयाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पदयात्रा, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग लाभला.
गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टने शिवजयंतीच्या निमित्ताने तरुण पिढीमध्ये इतिहासाची जाणीव व समाजभान निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे या वेळी दिसून आले. या कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कारविजेते व मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी आप्पासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात तरुणाईला प्रेरणा देण्याचे कार्य ट्रस्टच्या माध्यमातून घडल्याचे या वेळी दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhaji Maharaj Statue Mohol : सोलापुरातील मोहोळ शहरात विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, पोलिस छावणीचे स्वरूप

कॅमेरासमोर महिला स्पर्धकाला घातली आंघोळ, एल्विश यादवच्या शो पाहून प्रेक्षक नाराज, टी-शर्ट काढला आणि... Viral Video

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ मेट्रो आणि नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

Photos : 35 कोटी वर्षे दुर्मिळ 'हसणारा' दगड! ज्याला समजलं होतं नकली दात; तो निघाला प्राचीन जीव, जगभर फोटो व्हायरल

IND vs SA, Playing XI: भारतीय संघ एका बदलासह दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार? बघा कोणाचा पत्ता कट होणार; अभिषेक शर्मा कायम...

SCROLL FOR NEXT