मुंबई

मोखाड्यातील पांडवकालीन ‘सात कुंड'' दुर्लक्षित

CD

मोखाड्याचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित
सात कुंडांना पर्यटनाचा दर्जा देण्याची मागणी

मोखाडा, ता. २१ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील डोल्हारा गावात असलेले ऐतिहासिक सात कुंड आजही शासनाकडून दुर्लक्षित आहेत. कडक उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवणाऱ्या या भागात वर्षभर पाण्याचा साठा जपून ठेवणारी ही जमिनीत कोरलेले कुंड स्थानिकांसाठी आजही आश्चर्याचा विषय ठरत आहेत. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटनाचा दर्जा देऊन त्याचा विकास करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

डोल्हारा-साखरवाडी परिसरात असलेल्या या कुंडांबाबत गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सांगण्यानुसार, हे कुंड पांडवकालीन आहेत. जमिनीत दगडात कोरलेले हे सात कुंड नेमके कोणी आणि कधी बांधले, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत पुरातत्त्वीय निष्कर्ष समोर आलेला नाही. या कुंडांमधील पाणी बाराही महिने टिकून राहते. त्यामुळे या भागातील आदिवासी वस्तीसाठी हे कुंड आजही पाण्याचे मुख्य स्रोत ठरत आहेत. या ऐतिहासिक वारशाचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.

मोखाडा येथून १५ किमी आणि खोडाळा येथून सात किमी अंतरावर असलेल्या डोल्हारा गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकवस्ती आहे. या सात कुंडांचे संवर्धन केल्यास इतिहास, निसर्ग आणि पर्यटन यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळेल. या ठिकाणाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यास परिसराचा विकास होईलच, पण त्यासोबत स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि गावाची नवी ओळख निर्माण होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. डोल्हारा ग्रामपंचायत हद्दीतील साखरवाडीजवळ सुरुवातीला पाचच कुंड माहीत होते, पण ज्येष्ठांनी आणखी दोन कुंड शोधून काढले. हे सात कुंड पांडवकालीन असून, त्यांचे पाणी आजही आमची तहान भागवत आहे. सरकारने याचे जतन करून विकास करावा, अशी मागणी ज्ञानेश्वर पालवे यांनी केली आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
पुरातत्त्व विभागाने तातडीने या स्थळाची पाहणी करून संशोधनासाठी पावले उचलावीत. तसेच स्थानिक आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्यांनी या विषयाचा शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. संशोधनामुळे या कुंडांचा इतिहास जगासमोर येईल आणि एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थळ म्हणून या भागाचा विकास होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT