मुंबई

‘माझी वसुंधरा’मध्ये नवी मुंबई महापालिका द्वितीय

CD

वाशी, ता. २१ (बातमीदार) : राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’अंतर्गत नवी मुंबई महापालिकेला १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अमृत शहरांच्या गटात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.
१ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था व २७,८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक संस्थांनी सहभाग नोंदवला होता. निसर्गातील पंचतत्त्वांवर आधारित या अभियानात नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक थिमॅटिक क्षेत्रात उल्लेखनीय व परिणामकारक कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पालिकेला द्वितीय क्रमांकाचा मानाचा बहुमान प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, तसेच आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातील आपली प्रभावी कामगिरी अधोरेखित केली आहे. भूमी संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने नियोजनबद्ध पावले उचलण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करताना जैवविविधतेला प्राधान्य देत देशी वृक्ष प्रजातींची लागवड करण्यात आली. या वृक्षांची जिओ टॅगिंगसह वृक्षगणना करण्यात आली असून, रोपवाटिकांची निर्मिती व स्थानिक प्रजातींच्या संवर्धनावर विशेष भर देण्यात आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या अभियानाच्या सर्व पाचही थिमॅटिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केल्यामुळे राज्यात मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई महापालिकेला द्वितीय मानांकनाचा बहुमान प्राप्त झालेला आहे. हा सर्व लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या एकत्रित कार्याचा गौरव आहे. यापुढील काळात शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल प्रतिबंध या दिशेने महापालिका सातत्याने पुढाकार घेत राहील.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT