मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवस्पर्श २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

CD

सुविद्यालयात ‘छत्रपती शिवस्पर्श २०२६’चा जयघोष
जाणता राजा, हिरकणीच्या प्रयोगांनी वेधले लक्ष
मुंबई, ता. २१ ः वझिरा नाका येथील सु.प्र.संघाच्या सुविद्यालयात गुरुवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवस्पर्श २०२६’ या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम मोठ्या जल्लोषात व देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे कार्यवाह मिलिंद जोशी आणि संस्थेच्या कार्याध्यक्षा देवयानी सबनीस यांचीही उपस्थिती होती.
सुविद्यालय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उल्का वर्तक यांच्या सुयोग्य नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ नाटक, ‘हिरकणी’ नाटिका, ‘युगत मांडली’ सादरीकरण तसेच एकपात्री-आधुनिक जिजामाता, पोवाडा, अशा विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांमधून त्यांचे देशप्रेम, शौर्य आणि सांस्कृतिक जाण प्रकर्षाने दिसून आली. शिक्षकवृंद, पालकवर्ग व संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांचे विविध कलागुण पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिकांचे मार्गदर्शन, शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ‘छत्रपती शिवस्पर्श २०२६’ स्नेहसंमेलन अविस्मरणीय ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT