बारमधील अश्लील नृत्यप्रकरणी गुन्हा
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून दलालांसह १४ महिलांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ ः डोंबिवली विभागातील पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत बारमधील अश्लील नृत्यप्रकरणी गुन्हा नोंदवला, तसेच रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या देहव्यापाराविरुद्ध स्वतंत्र मोहीम राबवत दलालांसह १४ महिलांवर शनिवारी (ता. २१) कारवाई केली. या दुहेरी कारवाईमुळे शहरातील बेकायदा प्रकारांवर पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
शुक्रवार-शनिवारी (ता. २१) मध्यरात्रीच्या सुमारास मानपाडा पोलिस ठाणे हद्दीतील रिगल बार येथे अश्लील नृत्य सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी स्वतः पथकासह बारवर अचानक धाड टाकली. या कारवाईत पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, के. आर. पाटील तसेच इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. संबंधित बार व्यवस्थापन व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले चौक पोलिस ठाणे पथकाने स्वतंत्र कारवाई केली. या कारवाईत चार एजंट आणि १० पीडित महिलांसह एकूण १४ जणांविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमासह संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित महिलांची सुटका करून त्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. शहरातील बार, लॉज व तत्सम आस्थापनांवर आगामी काळातही अशाचप्रकारे तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.