मुंबई

गोरेगावच्या जवाहर नगरमध्ये चप्पल दुकान आगीत खाक

CD

गोरेगावच्या जवाहर नगरमध्ये चप्पल दुकान आगीत खाक
मालाड, ता. २२ (बातमीदार) ः जवाहर नगर येथील रोड क्र. ११, प्लॉट क्र. २०० परिसरातील चप्पल दुरुस्ती व विक्री करणारे दुकान आज (ता. २२) पहाटे लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश एकनाथ जाधव यांचे चप्पल दुरुस्तीचे दुकान २२ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झाले. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक व गोरेगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र, आगीत प्रकाश जाधव यांचा स्टॉल तसेच विक्रीसाठी ठेवलेले चप्पल, बूट व इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून, त्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेमुळे त्यांच्या समोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची पुढील चौकशी पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Pune News: रुग्णांच्या जिवाशी खेळ, निकृष्ट औषधे वितरित; थेरगाव रुग्णालयातील प्रकार, तब्बल १६ हजार गोळ्यांची बॅच परत, चौकशीचे आदेश!

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

SCROLL FOR NEXT