मुंबई

मुंबईत गुन्हे करून अजमेरमध्ये झाला फकीर

CD

मुंबईत गुन्हे करून अजमेरमध्ये झाला फकीर
आठ वर्षांनी सराईत आरोपी जेरबंद
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात विविध गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपीला तब्बल आठ वर्षांनंतर राजस्थानातील अजमेर येथे अटक करण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले. विशेष म्हणजे, हा आरोपी मुंबईतून फरार झाल्यानंतर अजमेरमध्ये फकिराच्या वेशात राहत असल्याचे उघड झाले.
विकास जयप्रकाश सिंग (वय अंदाजे ३५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, २०१७ ते २०१९ या कालावधीत त्याच्यावर मुंबईत रेल्वे कायद्यासह विविध गुन्ह्यांची नोंद होती. २०१९ मधील एका प्रकरणात न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच २०२४ मध्ये रेल्वे न्यायालयाने रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत दोन अजामीनपात्र वॉरंट प्रकरणांत त्याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
८ मार्च २०२४ रोजी नोंदवलेल्या प्रकरणात तसेच १९ जून २०२४ रोजी आणखी एका गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल पोस्ट एलटीटीकडून त्याच्या अटकेसाठी विशेष पथक तैनात करण्यात आले होते.
उपनिरीक्षक गणेश कुमरावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी अजमेर दर्गा शरीफ परिसरात मुस्लिम फकिराच्या वेशात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने स्थानिक राजस्थान पोलिसांच्या मदतीने १७ फेब्रुवारी रोजी रात्री इंदर कोट परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
अटकेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला मुख्य न्यायिक दंडाधिकारी, अजमेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी त्याला मुंबईत आणण्यात आले. सध्या त्याची पुढील वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून, मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT